Type to search

नंदुरबार

अक्कलकुव्यात मतदान शांततेत

Share

अक्कलकुवा । अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार संघातील एकुण 349 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे 70.टक्के इतके मतदान झाले आहे.

आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. काही मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मतदार संथगतीने येत होते. काही ठिकाणी उत्साहात मतदान पार पडले, काही केंद्रांवर सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी ने चाळीशी पार केली होती. सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत संपुर्ण मतदार संघात सरासरी 38.32.टक्के मतदान तर दुपारी 3 वाजे पर्यंत 52.56 इतके मतदान झाले होते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाने अंदाजे 70 टक्के सरासरी गाठली होती.संध्याकाळी 6 नंतरदेखील काही केंद्रांवर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी रांग लावून हजेरी लावली. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या होत्या.

दिव्यांगांसाठी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांगांनीही मोठ्या उत्साहाने मतदान केले असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरीक, महिला, तरुण यांनीही उत्स्फूर्तपणे मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील बहुतांश मतदान केंद्रे ही दुर्गम व अतिदुर्गम भागात असल्यामुळे संध्याकाळी 6 वाजे पर्यंत मतदानाची निश्चित आकडेवारी समजली नाही.

दुर्गम भागातील केंद्रावरील माहिती रात्री उशिरापर्यंत मिळणार आहे. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील इ.व्ही.एम. यंत्र हे त्या त्या तालुक्यात संकलीत करण्यात येत होते. धडगाव येथील इ.व्ही.एम यंत्र एकत्र केल्यावर त्यां यंत्रांना शहादा प्रकाशा तळोदा मार्गे पोलीस बंदोबस्तात अक्कलकुवा येथे आणण्यात येतील. मतदार संघात निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली.संपुर्ण मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!