अकोले : संगमनेर ते बारी रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करावे; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे रस्ता रोको आंदोलन

0

अकोले तालुक्यातील कोल्हार -घोटी राज्यमार्गावरील संगमनेर ते बारी रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत व अन्य मागण्यांसाठी आज अकोले तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष विक्रम नवले व तालुकाध्यक्ष शंभू नेहे यांच्या नेतृत्वाखाली अकोले -संगमनेर रस्त्यावर बस स्थानकासमोर खड्ड्यांत सत्यनारायण करून सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.राज्यातील करंट्या व दळभद्री सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी यापुढे लढण्याची तयारी ठेवा ,यापुढील काळात रडून नव्हे तर लढवून मिळवायचे असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.त्यासाठी आपण सदैव तुमच्या सोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी कार्यकर्त्यांना देत आंदोलनाचे हत्यार उपसा व मागण्या पदरात पाडून घेण्याचा वडीलकीचा सल्लाही माजी मंत्री पिचड यांनी बोलतांना दिला.

LEAVE A REPLY

*