अंबोली घाटात मोटारसायकल अपघातात एक ठार

0

नाशिक : त्र्यंबक-जव्हार रस्त्यावरील अंबोली घाटात मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.

विनायक भिमा जाधव (32, रा. तोरंगण, ता. त्र्यंबकेश्वर) असे या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक जाधव व त्याचा जोडीदार हिरामण गुलाब महाले (30, रा. गणेशगाव, ता. त्र्यंबकेश्वर) हे दोघे मोटारसायकलवरून येत त्र्यंबककडे येत होते. त्र्यंबक-जव्हार रस्त्यावरील अंबोली फाटा येथे त्यांची भरधाव वेगातील दुचाकी घसरून अपघात झाला यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या विनायक जाधव हे जागेवरच ठार झाले.

तर त्यांचा साथीदार हिरामण महाले हा गंभीर जखमी झाला. काही वेळानंतर हिरामण महाले यांना शुद्ध आल्यानंतर त्यांनी आपल्या ओळखीच्या सहकार्‍यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला. यानंतरत्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दोघांना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

परंतु तत्पुर्वीच विनायक जाधव यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. तर गंभीर जखमी असलेल्या हिरामण महाले यास उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*