अंजली दामानिया यांची कोर्टात बाजू : खडसेंच्या बदनामी दाव्यात अर्थ नाही!

0

मुक्ताईनगर |  वार्ताहर :  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्या प्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयात अंजली दमानिया व प्रिती मेनन यांचे विरुद्ध खटला सुरु आहे. या प्रकरणी ७ मार्च रोजी मुक्ताईनगर न्यायालयात सुनावणी होती.

मंगळवारी सकाळी १० वाजुन ५५ मिनिटांनी दमानिया यांचे एमएच – ४६ एव्ही ३३७३ पांढर्‍या रंगाच्या इनोव्हा गाडीतुन न्यायालय परिसरात आगमन झाले. त्यांचे समवेत शिवसेनेचे गजानन मालपुरे देखील होते.

images images 2

११ वाजता न्यायालयात न्यायाधीश आर. एम. तुवर यांचे समोर प्रत्यक्ष युक्तीवादास सुरुवात झाली. दमानिया यांनी स्वत : च न्यायाधीशांसमोर युक्तीवाद केला.

खडसे यांनी स्वत : माझे विरुद्ध खटला टाकायला पाहिजे होता. भारतीय जनता पार्टीचे एका पुढार्‍याने म्हणजे तिसर्‍या व्यक्तीने खटला दाखल केल्याने या केसमध्ये काही अर्थ नसल्याचे सांगितले. खटला दाखल करण्यापुर्वी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची परवानगी घेतली होती का ? असा प्रश्‍नही दमानिया यांनी उपस्थित केला.

याचिकाकर्ते रमेश ढोेले यांनी केसमध्ये अंडर सेक्शन ११ चा प्रकार टाकला आहे. सुप्रीम कोर्टाने आदेशान्वये तिसर्‍या व्यक्तीला असे दाखल करता येत नाही, खडसे यांनी हिंमत असेल तर माझे विरुद्ध स्वत लढवायला हवे पाहिजे होते. माझा फक्त एकच म्हणजे जावयाची लोमोझीन कारचा विषय होता. दाऊदशी संबंध असल्याचा माझा विषय नसल्याचेही दमानिया यांनी सांगितले.

युक्तीवाद सुरु असतांना न्यायालयाने याचिकाकर्ते रमेश ढोले व त्यांचे वकील संतोष टावरी यांचा पुकारा देखील शिपायाने केला. परंतु हे दोघेही गैरहजर होते. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दमानिया यांचे सोबत मु. नगर तालुका भारिप बहुजन महासंघाचे संजय कांडेलकर होते.

दमानिया न्यायालयाचे बाहेर पडताच साडेअकरा वाजेच्या सुमारास राखाडी रंगाच्या हुंडाई कंपनीचे गाडीतुन प्रितीमेनन न्यायालयात दाखल झाल्या. मेनन यांचे प्रकरणातील याचिकाकर्ते बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील न्यायालयात हजर होते.

मेनन यांनी मंगळवारी न्यायालयात पर्सनल बॉण्ड व मी दिल्लीत राहत असल्यामुळे माझे ऐवजी माझे वकील उपस्थित राहणार असल्याचे दोन अर्ज न्यायालयात दिले होते. दोघे अर्ज न्यायालयाने मंजुर केलेले असल्याचे मेनन यांनी सांगितले. पुढील सुनावणी ११ एप्रिल रोजी आहे.

सार्वजनिक जिवनात एखाद्याची बदनामी केलेल्या अनेक केसेस कोर्टात दाखल असुन त्याच प्रमाणे माजी मंत्री खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. आज काशी येथे असल्याने न्यायालयात हजर राहु शकलो नाही. माजी मंत्री खडसे यांचे विरुद्ध  दमानिया यांनी रचलेले हे एक षडयंत्र असुन दमानियांसह मेनन यांची चौकशी व्हावी असे याचिकाकर्ते रमेश ढोले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*