‘अंजली’ करतेय ८४ तास नॉनस्टॉप काम!

0

सोमवारपासून सुरु झालेल्या मालिकेच्या काही दृश्यांचे शूटिंग वेळेअभावी पूर्ण झाले नव्हते.

सकाळी ९ वाजता सुरु झालेली शिफ्ट साधारणतः रात्री ९ ला म्हणजेच १२ तासांनी संपते. मात्र, काही तांत्रिक गोष्टींमुळे एपिसोडचं पूर्ण बँकिंग वेळेत तयार झालं नव्हतं.

याचं महत्त्व सुरुचीला नीट समजत असल्यामुळे यातून मार्ग काढण्याची जबाबदारी तिनेच स्वीकारली.

मालिकेच्या एपिसोडचे जास्तीत जास्त बँकिंग व्हावे यासाठी सुरुची जोमाने कामाला लागली. गेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलं.

तिची ही मेहनत बघून दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि तिचे इतर सहकलाकारसुद्धा भारावून गेले. सुरुची ‘अंजली’च्या भूमिकेत इतकी समरस झाली की सेटवर सगळेच तिला ‘तुफानी अंजली’ या नावाने हाक मारतात.

आता तिची ही मेहनत प्रेक्षकांच्या मनाला किती भिडते हे मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून कळेलच.

LEAVE A REPLY

*