अंगणवाडी सेविकांची वज्रमुठ !

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनवाढी देवून शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा देण्यात यावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा काढून महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ आर.आर.तडवी यांना निवेदन देण्यात आले.
एकात्मिक बालविकासा सेवा योजनेतंर्गत कार्यरत सुमारे 2 लाख अंगणवाडीसेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविण्याचे शासनाने वेळोवेळी आश्वासन दिले आहे.

परंतू अद्याप मानधनात वाढ झालेली नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सेवा समाप्ती लाभामध्ये सुधारणा करून जास्त सेवा जास्त लाभ याप्रमाणे सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा.

सरकारने 8 मार्च रोजी जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडीसेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना भविष्यनिर्वाहनिधी लागू करण्यात यावा, अंगणवाडी कर्मचार्‍यांना इतर शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे आजारपणाची रजा तसेच उन्हाळी सुटी भरपगारी लागू करण्यात यावी.

अंगणवाडी केंद्राना पुरक पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांची थकीत बिले विनाविलंब अदा करून यापुढे दरमहा देण्यात यावी, मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्यात यावे, नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांसाठी सुधारीत घरभाडे लागू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासह प्रलंबीत मागण्यासाठी आज जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचार्‍यांच्यावतीने धडक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील व युवराज बैसाणे यांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.

यावेळी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास दि.4 रोजी आझाद मैदानावर महामोर्चा काढून सप्टेंबर महिन्यापासून अंगणवाडी केंद्र बंद करून बेमुदत संपावर जाण्याचा इशारावेळी देण्यात आला.

यावेळी अंगणवाडीसेविका सुषमा चव्हाण, मंगला नेवे, मिनाक्षी चौधरी, पुष्पा गवळी, पुष्पा परदेशी, सविता महाजन, साधना पाटील, बेवी पाटील, रत्ना सोनवणे, सुनंदा नेरकर, उज्वला पाटील, शोभा जावरे यांच्यासह अंगणवाडीसेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

*