अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी झेडपीकडे अनुदान प्राप्त

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मंजूर 69 अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 51 लाख 75 हजार रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी दिली.
गत वर्षभरापासून नातेवाईकांची अनुदानाची प्रतिक्षा होती. अखेर आता संपली आहे. सन 2013-14 पासून सदर राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली.

इयत्ता पहिली ते बारावी वर्गा पर्यत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यृ अथवा एक किंवा दोन अवयव निकामी झाल्यास त्यांना अनूदान दिले जाते. मात्र, गेल्या वर्षभरात सदर अनुदान प्राप्त न झाले नाही. अखेर राज्य शासनाने पूर्ण जिल्ह्यासाठी चार कोटी 66 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील 623 अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना लाभ होणार आहे. शिक्षणाधिकार्‍यांमार्फत ही रक्कम सात दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या बँक खाती जमा होणार आहे. आई/वडील किंवा भाऊ किंवा बहिणीच्या नावावर रक्कम जमा करता येणार आहे.

LEAVE A REPLY

*