भाजपकडून चांदेकसारे झेडपी गटासाठी तीन अर्ज दाखल

0

कोपरगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील चांदेकसारे जिल्हा परिषद गटात भाजपातर्फे वंदना बाळासाहेब औताडे, नलिनी बापूसाहेब गवळी, अश्‍विनी विकास पाचोरे या तीन उमेदवारांचे अर्ज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कोपरगाव तालुका औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विवेक कोल्हे उपस्थित होते.

याप्रसंगी संजीवनीचे उपाध्यक्ष शिवाजीराव वक्ते, संचालक अरुणराव येवले, श्रीपतराव गवळी, साईनाथ रोहमारे, अशोकराव औताडे, संजय होन, फकीरराव बोरनारे, बाळासाहेब वक्ते, विक्रम पाचोरे, रामदास रहाणे, बाजार समितीचे उपसभापती नानासाहेब गव्हाणे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे आदींसह कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

*