चांदेकसारे जिल्हा परिषद गटासाठी 67.69 टक्के मतदान

0

तीन उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; आज निकाल

रांजणगाव देशमुख/सोनेवाडी (वार्ताहर) – तालुक्यातील चांदेकसारे जिल्हा परीषद गटाच्या एका जागेसाठी रविवारी मतदान झाले. एकूण 36 हजार 671 मतदारांपैकी 24 हजार 822 मतदारांनी बोटाला शाई लावुन मतदानाचा हक्क बजावला. गटात सरासरी 67.69 टक्के मतदान झाले. दिवसभर पाऊस सुरू असल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रीया कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. दरम्यान आज तहसिल कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याची माहीती तहसिलदार किशोर कदम यांनी दिली.

या गटात राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सोनाली रोहमारे, भाजपाच्या आश्विनी पोचोरे व शिवसेनेच्या सिमा औताडे यांच्यात तिरंगी लढत झाली. तिन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन आज सोमवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी निकाल लागणार आहे. चांदेकसारे जिल्हा परीषद गटाच्या एका जागेसाठी रविवारी मतदान झाले. यात बुथनिहाय झालेले मतदान टक्केवारीत असे- चांदेकसारे 67.33 टक्के, चांदेकसारेे 56.27 टक्के, चांदेकसारे 55.00 टक्के, शहापूर 81.71 टक्के, घारी 67.69 टक्के, डाऊच खुर्द 74.43 टक्के, डाऊच खुर्द 62.19 टक्के, मढी खुर्द 71.47 टक्के, मढी खुर्द 71.36 टक्के, देर्डे चांदवड 74.98 टक्के, देर्डे कोर्‍हाळे 73.39 टक्के, देर्डे कोर्‍हाळे 68.98 टक्के, जेऊर कुंभारी 73.62 टक्के, जेऊर कुंभारी 61.51 टक्के, जेऊर कुंभारी 58.25 टक्के, सोनेवाडी 65.76 टक्के, सोनेवाडी 62.19 टक्के, सोनेवाडी 63.73 टक्के, वेस 66.29 टक्के, पोहेगांव 72 टक्के,

पोहेगांव 74 टक्के, पोहेगांव 68 टक्के, पोहेगांव 73.93 टक्के, पोहेगांव 65.96 टक्के, पोहेगांव 73.50 टक्के, मनेगांव 7.26 टक्के, रांजणगांव देशमुख 58.43 टक्के, रांजणगांव देशमुख 49 टक्के, रांजणगांव देशमुख 51 टक्के, धोंडेवाडी 77.32 टक्के, अंजनापूर 67.42 टक्के, जवळके 73.75 टक्के, बहादरपूर 75.21 टक्के, बहादरपूर 77.54 टक्के, बहादराबाद 82.2 टक्के, काकडी 68.91 टक्के, काकडी 77.58 टक्के, काकडी 67 टक्के, सोयगांव 73.65 टक्के मतदान झाले. पाऊस सुरु असल्याने दिवसभर मतदारांचा ओघ कमी होता. दुपारी 4 वाजेनंतर मतदारांचा ओघ वाढला. त्यामुळे सायंकाळी गर्दी झाली होती. पावसामुळे मतदारांची मोठी तारांबळ उडाली. नेहमीपेक्षा मतदारांमध्ये या वेळेस कमी उत्साह पहायला मिळाला. दिवसभर विजेचा लपंडाव सुरु असल्याने काही काळ मोबाईलच्या प्रकाशाचा वापर करावा लागला. मतदान केंद्रावर आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे, नितीनराव औताडे, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी भेटी दिल्या.

LEAVE A REPLY

*