जिल्हा परिषद : अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका बुधवारी होणार

0

वर्ग 3 व 4 ची पदे भरणार 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून रिक्त असणार्‍या 62 जागांवर या नेमणुका करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.

जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकांचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला होता. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी आलेल्या अर्जाची छाननी करून गोपनीय अहवालासह त्यांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द केलेली आहे. यात पात्र असणारे उमेदवार आणि अपात्र असणार्‍या उमदेवारांची माहिती देण्यात आलेली आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सामान्य प्रशासन विभाग तयार करीत होता.

बुधवारी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी पात्र असणार्‍या उमदेवारांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांच्या मूळ कागदपत्रांसह बोलविण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त असणार्‍या जागांची माहिती त्यांना देऊन त्यांच्या शैक्षणिक आर्हतानुसार त्यांना नेमणुका देण्यात येणार आहेत. रिक्त जागांमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक, स्थापत्य अभियंता यासह अन्य संवर्गाच्या जागांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*