फसवणूक प्रकरणी झेडपीचे कनिष्ठ सहायक जोशींना अटक

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागात कार्यरत असणारे एका कनिष्ठ लिपीक महेश मनोहर जोशी (रा. नगर कल्याण रोड) यांने पदाचा गैरवापर करुन ठेकेदारांना मदत केली. तसेच शासनाची 7 लाख 12 हजार 120 रुपयांची ङ्गसवणुक करुन शासनाच्या योजना विशि ठेकेदारांनी मिळवुन देण्यात मदत केली. याप्रकरणी झेडपीचे बांधकाम (दक्षिण) विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब सिताराम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी महेश जोशी हा जिल्हा परिषदेत कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहे. त्यांनी शासकीय नोकरीत पदाचा दुरूपयोग करुन जिल्हा परिषदेने अंगनवाडी ईमारतीचे वेगवेगळ्या ठेकेदारांना दिलेल्या ठेक्याची बयाणा रक्कम स्वत:च्या खात्यातून जिल्हा परिषदेच्या खात्यात भरली. व नंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या खात्यातून 7 लाख 12 हजार 120 रुपये रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग केले.
ही निविदा वाटपाचे काम करणार्‍या व्यक्तीने अलिप्तपणे व गोपनीय काम करण्याचे अनेक्षित आहे. जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा जास्त ठेकेदार ई-निवेदा भरतात. तेव्हा त्यांना एकमेकांनी भरलेले दर माहीत नसणे अपेक्षित असते. तसेच निविदा कक्षेचे काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना देखील ही रक्कम माहित नसणे अपेक्षित आहे. पण जेव्हा निविदा लिपीकच विविध कामांतील विविध ठेकेदारांची निविदा भरतो. तसेच एम. डी. (बयाणा रक्कम) स्वत:च्या खात्यातुन भरतो.
म्हणजे त्याला अधिकृतरित्या निविदा खुल्या करण्यापुर्वी त्यास हे दर माहित होतात. म्हणजे हा शासकीय गोपनीयतेचा भंग आहे. याचा अर्थ असा होतो की आरोपी याने विशिष्ठ ठेकेदारास ठेकेदारी मिळण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे या ठेकेदारीत निकोप स्पर्धा झाली नाही. म्हणून महेश मानोहर जोशी याने त्याच्या पदाचा गैरवापर करुन शासनाची ङ्गसवणुक केली आहे. असे बाळासाहेब भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*