नाशिकचे नाव गिनेज बुकात; प्रज्ञा पाटील यांचा सलग १०२ तास योगाचा विक्रम

नाशिक, ता. २० : नाशिकच्या प्रज्ञा पाटील यांनी सलग 103 तास मॅरेथॉन योगा करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान पटकावून नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर कोरले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक दिवस आधीच हा विक्रम नोंदविलो गेल्याने नाशिकसह भारताची मान जगात उंचावली आहे.

१६ ते २० जून दरम्यान इगतपुरी येथील ग्रँड गार्डन रेसॉर्ट येथे त्यांनी या मॅरेथॉन योगाला सुरुवात केली होती.

दिनांक १६ जूनला पहाटे साडेचार पासून त्या मॅरेथॉन योगाला सुरुवात होऊन आज २० तारखेला सकाळी साडेआठ वाजता बरोबर १०० तासांनी त्याची सांगता  झाली आणि त्यांच्या नावावर एक नवा विक्रम नोंदविला गेला. आज सकाळी साडेअकरा वाजता सलग योगासनांचे 103 तासाचे काऊंटडाऊन संपल्यानंतर उपस्थित योगाप्रेमीनी एकच जल्लोष केला.

या काळात त्यांनी केवळ द्रवपदार्थांचे सेवन केले. या आधीचा विक्रम ५७ तासांचा असून तमिळनाडूच्या के.पी.रचना यांच्या नावे होता. तो प्रज्ञा पाटील यांनी १८ तारखेलाच सलग ५८ तास योगा करून मोडीत काढला होता.

दरम्यान भारतीय योगशास्त्र हे जगातील एकमेव असे शास्त्र आहे की ज्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला आहे, त्यामुळे या विक्रमामुळे योगशास्त्र आणि नाशिकचे नाव जागतिक स्तरावर जाऊन, आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचे महत्व अधोरेखीत करण्याचा उद्देश सफल होणार असल्याचे प्रज्ञा पाटील यांनी यापूर्वी देशदूला सांगितले  होत.

तसेच आपण १८ तारखेलाच आधीचा विक्रम मोडीत काढू असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला होता.

उद्योजिका असलेल्या प्रज्ञा पाटील मुळच्या रावेर, जि. जळगाव येथील असून उद्योग व्यवसायानिमित्त त्या नाशिकला स्थायिक झाल्या.

पावडर कोटींग आणि फॅब्रिकेशनच्या उद्योगात त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर विविध पुरस्कारही मिळवले आहेत. एका आजारपणाचे निमित्त होऊन त्या योगशास्त्राकडे वळाल्या आणि त्यानंतर त्यांना योगाची आवड निर्माण झाली.

पुढे त्यांनी या शास्त्रात एम्ए देखिल केले. सध्या त्या पीएचडी करत आहेत. योगगुरू विश्वासराव मंडलीक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असून गिनेज रेकॉर्डसाठी आपल्या गुरुंनी प्रोत्साहन दिल्याचेही त्या नम्रपणे नमूद केले होते.

यावेळी आमदार देवयानी फरांदे,प्रा.डॉ.मीनाक्षी गवळी,उद्योजक अविनाश गोठी, रोहिणी नायडू भाजपच्या शहर उपाध्यक्षा सोनल दगडे,संध्या शिरसाट,मनोरमा पाटील,दीपाली गवांदे,अश्विनी डोंगरे,मीनाक्षी आहेर,वंदना रकीबे,गौरव पाटील,गौरागी पाटील आदी उपस्थित होते.

नाशिककर योग प्रशिक्षिका करणार सलग १०० तासांचा योग-विक्रम

LEAVE A REPLY

*