मविप्रचा वर्ल्ड ऑलिम्पिक डे रन उत्साहात

0
नाशिक । जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून मविप्र संमाज संस्थेतर्फे 1 किमी अंतराचा ऑलिम्पिक डे रन घेण्यात आला.

महापौर रंजना भानसी व अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत, डॉ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ऑलिम्पिक स्पर्धांचे जनक बॅरन पिअर द कुबर्टिन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच ऑलिम्पिक ध्वजाचे संस्थेने मराठीत तयार करण्यात आलेल्या ऑलिम्पिक गीताची धून वाजवून ध्वजारोहण करण्यात आले.

प्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आ. जयंत जाधव, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनपा विरोधी पक्षनेत अजय बोरस्ते, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अशोक दुधारे, साहेबराव पाटील, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सेवक संचालक डॉ. अशोक पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, प्रा. रामनाथ चौधरी, सी. डी. शिंदे, डॉ. एन. एस. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य दिलीप डेर्ले, डॉ. कैलास होळकर, डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. दिलीप शिंदे उपस्थितीत होते.

वर्ल्ड ऑलिम्पिक डे रनला संस्थेचे सर्वोत्कृष्ठ खेळाडू सागर गाढवे, निकीता संभेराव, पायल पळसकर, हर्षल शार्दुल, गौरव लांबे, प्राजक्ता बोडके, स्नेहल विधाते, शरयू पाटील, अंजली मुर्तडक यांच्या हस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्त ऑलिम्पिक विषयी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. यात ओम लवांडने प्रथम, रुचिता आहिररावने दुसरा, हर्ष गुंजाळने तिसरा क्रमांक मिळवला.

ऑलिम्पिक डे रन यशस्वी करण्यासाठी मविप्र क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राजाराम कारे, दिलीप गायकवाड, आर. एन. पवार, अनिल उगले, सुहास खर्डे, राजेंद्र पोटे, विक्रांत राजोळे, गणेश कोंडे, नारायण वडजे, सोमेश्वर मुळाणे, रमेश तुंगार यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

*