शाडू मातीच्या गणेशमूर्तीसाठी कार्यशाळा

0
नाशिक | पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा. पर्यावरणाचे रक्षण केले जावे या उद्देशाने   शहरातील म्हसरूळ येथील वंडर किड्स प्ले स्कूल अँड नर्सरी तर्फे शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
दिनांक १९ ऑगस्ट ला हि कार्यशाळा घेण्यात येईल अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती चे लवकर विघटन होत नाही.
त्यामुळे या अनेक ठिकाणी जल प्रदूषणासह अस्वछता होत असते. शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार झाल्यावर विसर्जनावेळी त्या १० मिनिटात पाण्यात विरघळतात. घरातल्या बादलीत या गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर हे मातीचे पाणी कुंडीत टाकता येते.
यामुळे जलप्रदूषण टाळले जाते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी तयार केलेली एक आकर्षक व सुंदर मूर्ती घरात गणेशोत्सवात स्थापन करावी असे शाळेच्या मुख्याध्यापक उर्मी झलावत यांच्या संकल्पनेनुसार ही
 कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*