फौजींच्या गावातील रणरागिणींचा ग्रामपंचायतीवर ‘टमरेल मोर्चा’

1

नांदगांव दि ८ (प्रतिनिधी) :  तालुक्यातील फौजीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिसवळ बुद्रूक येथील महिलांनी आज ग्रामपंचायतीवर टमरेल मोर्चा काढून पंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

गावातील शौचालयाची दुरवस्था असून तेथे वापरासाठी पाणी नाही. या संदर्भात तक्रार करूनही दखल न घेतल्याने महिलांनी हे पाऊल उचलले.

जिल्हापरिषद आशाबाई जगताप यांचे हे गांव आहे. गावातील २०० तरुण भारतीय सैन्यदलाच्या सेवेत आहेत, तर काही तरुण परदेशात शिक्षण घेतात.

मात्र अशा गावातील महिलांसाठी शौचालयाची चांगली सोय नसल्याने महिलांनी निवेदन दिले. त्याचा काहीच परिणाम न झाल्याने अखेर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावले.

जोपर्यंत गटविकास अधिकारी गावाला भेट देऊन महिलांच्या समस्या सोडविणार नाही, तोपर्यंत टाळे काढले जाणार नसल्याची भूमिका महिलांनी घेतली आहे.

विशेष म्हणजे आधी दिलेल्या निवेदनावर जि.प. सदस्या. आशाबाई जगताप यांची स्वाक्षरी होती.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

*