डांगसौंदाण्यात जयाजी सूर्यवंशींच्या पुतळ्याला चपलांचा हार; शेतकरी संपात महिलांचा आक्रमक पवित्रा

0

डांगसौंदाने (प्रतिनिधी) : शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशीही नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधील डांगसौन्दाने गावातील शेतकरी महिलानी आक्रमक पवित्रा घेतला.

आंदोलनात महिला शेतकरी वर्ग उतरल्याने शेतकरींच्या नावाने नेतेगिरी करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या जयाजी सूर्यवंशीच्या पुतळ्याला जोड़े मारत पुतळा दहन केला.

डांगसौंदाने येथे परवाच्या दिवशी राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढून राज्यसरकारचा जोरदार निषेध् केला होता.  आज पुन्हा गावातील असंख्य महिला शेतकरी वर्गाने एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली.

किसान क्रांतिचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत जोड़े मारून पुतळा दहन केला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य सिंधु सोनवणे, माजी सरपंच लीलाबाई सोनवणे, विद्यमान सरपंच पमाबाई सोनवणे, उपसरपंच प्रफुलता सोनवणे यांनी केले.

या आंदोलनात सीमा सोनवणे वंदना सोनवणे जयश्री सोनवणे उज्वला जाधव चित्रा अहिरे सिन्धुबाई  खैरनार उषा जाधव कमल गंगुर्डे संगीता बोरसे मनोरमा गांगुर्दे तुलसाबाई सोनवणे दीपाली सोनवणे अरुणा सोनवणे सुमनबाई सोनावणे लता सोनवणे सह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

*