दारु दुकानाच्या विरोधात रणरागीणी एकवटल्या

म.बाद रोडवरील ड्रिम कॅसल परिसरांतील दुकान पाडले बंद

0
पंचवटी | दि. २३ प्रतिनिधी – मालेगांव स्टॅड परिसरांतील दारु दुकानांना स्थानिक रहिवाश्यांनी विरोध करीत ही दुकाने बंद पाडल्याची घटना ताजी असतांनाच मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल परिसरांत नविनच सुरु करण्यात आलेले एक दारु दुकान स्थानिक महिलांना बंद पाडले.

 

आज सायंकाळी स्थानिक रहिवाश्यांनी या दुकाना समोर आंदोलन करतांना या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केल्याने हे दुकान बंद करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत हे दुकान सुरु होता कामा नये असा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.

 
पंचवटी परिसरांतील राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मिटर परिसरांच्या आत असलेली सर्व दारु दुकाने बंद झाल्याने दारु दुकान मालकांनी आता हायवे पासून ५०० मिटरच्या बाहेर असलेल्या रहिवासी क्षेत्रात दुकान सुरु करण्याची धडपड सुरु केली आहे. यातून मखमलाबाद रोड वरील ड्रीम कॅसल या इमारतीच्या गाळ्यात हॉटेल किक रेस्टॉरंट ऍण्ड बार हे दारु दुकाने आज पासून सुरु झाल्याचे परिसरांतील रहिवाश्याच्या लक्षात आले.

यावेळी स्थानिक रहिवाश्यानी आज सायंकाळी एकत्र येत या दुकाना समोर आंदोलन केले. दरम्यान पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील याठिकाणी दाखल झाले होते. ड्रीम कॅसल इमारतीत ८४ प्लॅट धारक व २२ गाळेधारक लोक राहतात. तसेच हा परिसर सुशिक्षित म्हणून परिचित आहे. या ठिकाणी ६ प्राचीन मंदिरे, शाळा आहेत.

या परिसरांत यापुर्वी या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांनी यापुर्वी उच्छाद माडल्याच्या घटना झाल्या आहेत. अश्यातच दारु दुकान आल्यास या घटनां मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नविन झालेले दारु दुकान त्वरीत हटविण्याची मागणी नागरीकांनी केली.

तसेच याबाबतचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांना देण्यात आले. या परिसरांत दारु दुकान सुरु राहिल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरीकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*