जेव्हा सोशल मीडियावर श्वेता तिवारीची ‘मृत्यूची’ बातमी व्हायरल होते तेव्हा…

0
मुंबई : सोशल मीडियावर आजकाल फोटो आणि बातम्या वेगाने पसरत आहेत. परंतु अफवा आजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.  तसाच एक प्रकार अलीकडे टीव्ही ऍक्ट्रेस श्वेता तिवारी यांच्या सोबत घडला.

तिच्या मृत्यूची बातमी आली आणि या बातमीचे सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा माध्यमांनी तिचा पती अभिनवशी संपर्क साधला  तेव्हा त्याला धक्काच बसला.

त्याने तातडीने श्वेताला फोन करून तिची विचारपूस  केली असता श्वेता सुखरूप असल्याचे तिचा पती अभिनव ने स्पष्ट केले. तिच्या मृत्यूची बातमी केवळ अफवा असल्याचे त्याने सांगितले.

श्वेता सोबत हा घडलेलला  प्रकार पहिल्यांदा नसून तिसऱ्यांदा तिच्या मृत्यूची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

LEAVE A REPLY

*