व्हॉट्सअप हॅकींग च्या 28 तक्रारी दाखल; नागरिकांमध्ये घबराहट

अनोळखी व्यक्तींशी चॅटींग न करण्याचे आवाहन

0
नाशिक । व्हॉट्सअप हॅकर्संनी शहरात धुमाकूळ घातला असून तक्रारींमध्ये वाढ होवू लागली आहे. शहरातील अनेका नागरिकांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाले आहे. यापैकी 28 जणांनी सायबर पोलीसांत तक्रार नोंदवल्या आहे. यात 28 पैकी 26 महिलांचा सहभाग आहे.

यावरून हॅकर्सनी महिलांना टार्गेट केल्याचे उघड झाले असून नाशिकमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमिवर सायबर सुरक्षेकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. व्हॉट्स हॅर्कसनी गेल्या काही तासांपासून धुमाकूळ घातला असून त्यांच्या या कारवाया वेगाने वाढत आहे.

यासंदर्भात आत्तापर्यंत 28 पिडीतांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून तक्रारदारांची संख्या वाढत आहे. हॅकरने हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करून अश्लिल मॅसेज पाठवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पोलिस यत्राणाही संतर्क झाली असून तपासकार्य वेगाने सुरू केले आहे.

हॅकर्स वन टाईम पासवर्ड (आटीपी) वापरून हे उद्योग करत असल्याचे समोर आले आहे. व्हॉटसअ‍ॅप किंवा फेसबुक अंकाऊट रिइन्सॉटल करताना संबंधीत कंपीनकडून ओटीपी पाठवला जातो. या प्रकरणात हॅकरने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील एकाचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करत आहे.

त्यानंतर कॉन्टेक्ट लिस्टमध्ये पोहचून इतरांचे मोबाईल हॅक केले जात आहे. व्हॉटसअ‍ॅप अकाउंट हॅक करून रिइन्सॉटल करताना नागरिकांच्या मोबाईलवर ओटीपी आल्यावर हॅकरर्स हॅक केलेल्या अकाउंटवरून ओटीपी पाठवण्याची विनंती करतो. आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागत असल्याचे समजून संबंधितांने हा मॅसेज फॉरवर्ड केल्यास अंकाऊट हॅक होते.

अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली. यापुढे जाऊन संशयित आरोपीने काहींचे फेसबुक अकाउंट देखील हॅक केले असून बुधवारपासून सायबर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी 28 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी चॅटींग करणे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रकाराणात नाशिक सायकलिस्ट असोशिएशनमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. मनिषा रौंदळ यांच्या हॉट्सअप अकांऊटवरून गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांना अश्लिल संदेश पाठवले जात आहे.

यानंतर डॉ. मनिषा यांनी मोबाईल, नेट सगळं बंद ठेवले असले तरी हे प्रकार सुरूच होते. त्याचबरोबर डॉ. सारीका देवरे यांच्या बाबतीतही हा प्रकार घडला. यानंतर त्यांनी काल सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

डॉ. मनिषा रौंदळ आणि डॉ. सारिका देवरे यांच्यासह शहरातील अनेक डॉक्टर, मॉडेल, खेळाडू, उद्योजक, विद्यार्थींनी हॅकर्सच्या उपद्रवांनी हैराण झाले आहेत. सायबर पोलिसांनी दोन अज्ञात हॅकर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप हॅकींगचा हा शहरात घडलेला पहीलाच प्रकार आहे.

अनोळखी व्यक्तीशी चॅटींग टाळादोन दिवसांपूवी एक अनोळखी महिला व्यक्त माझ्याशी व्हॉट्सअपवर हिंदीत संवाद साधू लागली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तीचा फोन आला आला मला आलेला टेक्स मॅसेस फॉवरर्ड करण्याची विनंती केली. गरबडीत असल्याने कोणताही विचार न करत मी तो मॅसेस त्या महिलेला फॉरवर्ड केला.

त्यानंतर माझ्या व्हॉट्सअप अकांऊवरून बर्‍याच जणांना अश्लिल मॅसेज जावू लागले. त्यामुळे अनेकांचे फोन येवू लागले. त्यानंतर झालेल्या प्रकाराविषयी मी सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आपले व्हॉट्सअ‍ॅप अकांउट सुरक्षित ठेवण्यासाठी अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करणे टाळावे. – डॉ. मनिषा रौंदळ, तक्रारकर्त्या.

LEAVE A REPLY

*