‘या’ मोबाईलवर ‘व्हॉट्सअप’ होणार कायमचे बंद

0
जगात संपर्काचे प्रभावी माध्यम समजले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअपने डिसेंबर 2016 नंतर काही फोन मॉडेल्सवर व्हॉट्सअप चालणार नसल्याचे जाहीर केले होते.

मात्र ती मुदत व्हॉट्सअपने वाढवली होती. आता मात्र 30 जूननंतर काही स्मार्टफोनवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही.

नोकियाच्या सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीम व ब्लॅकबेरी 10 ऑपरेटिंग सिस्टीमचा यामध्ये समावेश आहे. सिंबियन ऑपरेटिंग सिस्टीमच्या एस 40 आणि एस 60 सिरीजच्या फोनवर व्हॉट्सअप उपलब्ध होणार नाही.

तसेच डिसेंबर 2017 नंतर अँड्रॉईड 2.2 Froyo, विंडोज 7 आणि आयओएस 6 वरही व्हॉट्सअप काम करणार नसल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*