#WhatsApp : व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट : ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते आता अॅडमिन ठरवणार!

0

व्हॉट्सअॅपकडून आणखी एक नवीन अपडेट देण्यात आले आहे.

या अपडेटमध्ये ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे.

मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल.

WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवी अपडेट देण्यात आली आहे. “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल, असंही बोलले जात आहे.

अॅडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता. त्याला रिप्लाय देता येणार नाही. बंदी घातलेल्या ग्रुपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.

ग्रुपमधील कोणते सदस्य ग्रुपचं नाव आणि आयकॉन बदलू शकतात, हे आता ग्रुप तयार केलेला अॅडमिन ठरवू शकेल.

LEAVE A REPLY

*