कौन बनेगा करोडपतीमध्ये झालेत असे बदल; जाणून घ्या सविस्तर

0
लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’चा 9 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला अमिताभ बच्चन पुन्हा एकदा येत आहेत. येत्या 28 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता हा शो प्रसारित होईल.

यंदाच्या सिझनमध्ये केबीसीचे 30 एपिसोड प्रसारित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा इंटरेस्ट वाढवण्यासाठी केबीसीमध्ये काही नवे बदल करण्यात येणार आहेत.

यादरम्यान खाली बदल यंदाच्या सीझनमध्ये अनुभवण्यास मिळण्याची शक्यता आहे.

व्हिडिओ-ए-फ्रेंड : पहिला बदल म्हणजे ‘व्हिडिओ-ए-फ्रेंड’ यानुसार आता फोन ऐवजी व्हिडिओ कॉलचा ऑप्शन देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सिझनमध्ये स्पर्धक ‘फोन-ए-फ्रेंड’ हा पर्याय वापरून मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करुन उत्तर विचारू शकत होते.

आता फोनऐवजी व्हिडिओ कॉल करुन स्पर्धकांना संवाद साधता येणार आहे. या पर्यायामुळे शोचे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येणार असल्यामुळे अधिक उत्सुकता आहे.

2) लाईफलाइन जोडीदार : यंदापासून स्पर्धकांना एक नवीन लाईफलाइन मिळणार आहे. ‘लाईफलाइन जोडीदार’च्या पर्यायामुळे स्पर्धकासोबत हॉट सीटवर बसण्यासाठी एक पार्टनर आणू शकतील.

3) जॅकपॉट प्रश्न : यंदाच्या सीझनमध्ये जॅकपॉट प्रश्न हा महत्त्वपूर्ण बदल आहे. जॅकपॉट प्रश्न निवडल्यास इतर सर्व लाईफलाइन बाद होतील. मात्र प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यास स्पर्धकाला थेट 7 कोटी रक्कम जिंकता येणार आहे.

यापूर्वी जिंकलेली रक्कम धनादेश स्वरुपात दिली जायची. आता डिजीटल पेमेंटद्वारे म्हणजेच स्पर्धकाच्या बँक खात्यात थेट ही रक्कम जमा होणार आहे.

4) वेग वाढणार : एका तासात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे या कार्यक्रमाला गती मिळणार आहे. त्याचप्रमाणे उत्तरासाठी स्पर्धकांना दिला जाणारा वेळ कमी करण्यात येणार आहे. केवळ 6 आठवड्यांसाठी हा शो असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

5) खास एपिसोड : विशेष एपिसोडमध्ये आपल्याला हॉट सीटवर रिअल लाईफ हिरो पाहायला मिळणार आहेत. 30 एपिसोड्सपैकी काही भाग हे विशेष एपिसोड असतील. ज्यामध्ये बिग बी रिअल लाईफ हिरोंना शोमध्ये आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*