नेवाशात गढूळ पाणीपुरवठा : मुख्याधिकार्‍यांना युवकांचा घेराव

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा शहराला गेल्या 15 दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून या विरोधात नागरिकांनी नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना घेराव घालून निवेदन दिले.
गढूळ पाणीपुरवठा होत असून फिल्टर प्लांटकड़े दुर्लक्ष झाल्याने इम्रान दारूवाले यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात जाऊन अशुद्ध गढूळ पाण्याबाबत विचारणा करत घेराव घातला व गढूळ पाण्याची बाटली मुख्याधिकार्‍यांना दाखविली. त्यानंतर अल्ताफ पठाण यांनी मध्यस्थी केल्याने युवकांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले.
पुढील दोन ते तीन दिवसांत शुद्ध पाणीपुरवठा होईल असे आश्‍वासन श्री. गांगोडे यांनी दिले. दोनतीन दिवसांत हा प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे इम्रान दारूवाले यांनी सांगितले.
यावेळी अल्ताफ पठाण, गफूर बागवान, इम्रान पटेल, अरबाज पठाण, शोएब पटेल, शाहरुख शेख, अज्जू पठाण, सोयल सय्यद, नसरुद्दीन पटेल, तालिब पिंजारी, अर्शद देशमुख, तोशीब दारूवाले यांच्यासह अन्य मुस्लीम युवक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*