‘माझा किताब तू घे’, – चीनला शांती संदेश

0

मुंबई : भारतीय बॉक्सिंगपटू विजेंदर सिंहनं आज खेळाडूबरोबरच आपण एक सच्चा भारतीय असल्याचं सिद्ध केलं.

मुंबईतल्या वरळीतील एनएससीआई इथं विजेंदरचा सामना चीनच्या मायमायतियाली झाला. या सामन्यात विजेंदरनं चांगला खेळ करत मायमायतियाली पराभूतही केलं.

मात्र जेव्हा किताब देण्याची वेळ आली त्यावेळी किताबाच्या रुपात देण्यात आलेला बेल्ट विजेंदरनं चीनच्या मायमायतियाली परत देण्याची ऑफर दिली.

विजेंदरनं सलग नववा व्यावसायिक लढत जिंकून आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले.

भारत आणि चीन यांच्यात शांततेच्या मार्गानं तिढा सुटावा. या भावनेनं आपण हा बेल्ट परत देण्याची ऑफर मायमायतियालीला दिली होती अशी भावना विजेंदरनं पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

या विजयानंतर मायमायतियालीनं आपली चीनी पद्धतीची टोपी विजेंदरच्या डोक्यात घातली. त्यानंतर विजेंदरनं भारत-चीन यांच्यातील तिढा शांततेनं सुटावा यासाठी जिंकलेला किताब (बेल्ट) परत करण्याची ऑफर मायमायतियाली दिली.

 

LEAVE A REPLY

*