VIDEOS: अमिताभ बच्चन खोटारडा माणूस : राम गोपाल वर्मा

0

राम गोपाल वर्माचा ‘सरकार ३’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामूसोबतच्या गप्पांमध्ये अमिताभ बच्चन यांचा पाराच चढला.

अमिताभ हे सर्वात खोटारडे व्यक्ती असल्याचे रामूने म्हटले.

राम गोपाल वर्माने अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक रंजक व्हिडिओ मुलाखत केली. यावेळी त्याने अमिताभ यांना अनेक प्रश्न विचारले.

त्याचे प्रश्न ऐकून ‘बिग बी’ वैतागले आणि असे मुर्ख प्रश्न न विचारण्यास त्याला सांगितले. खरंतर या दोघांमधील संभाषण हे सिनेमाच्या प्रमोशनचाच एक भाग आहे. या मुलाखतीचे काही क्लिप्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा प्रोमो बघून तुम्हाला ही पूर्ण मुलाखत पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाटेल.
‘सरकार ३’ बद्दल बोलायचे झाले तर या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत जॅकी श्रॉफ, मनोज बाजपेयी, अमित साध, यामी गौतम आणि रोनित रॉय हे तगडे कलाकारही दिसणार आहेत.

१२ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*