VIDEO: #FU: ‘गच्ची’ सलमानचे मराठी गाणे प्रदर्शित

0
महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित ‘एफ यू’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.
त्यामुळे या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण आता या चित्रपटाच्या चर्चेला एक नवे कारण मिळाले आहे. ते म्हणजे या चित्रपटातून सलमान खान मराठीत गायक म्हणून पदार्पण करत आहे. त्याचे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
सलमानचे मराठी प्रेम सर्वश्रुत आहे. यापूर्वी रितेश देखमुखच्या लय भारी चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता. पण आता चक्क त्याचा आवाज चाहत्यांना ऐकायला भेटणार आहे. तोही मराठी गाण्यात.
सलमान खानने या चित्रपटातील गच्ची हे गाणे गायले आहे. कश्मिरा शहा आणि चित्रपटातील तरुणाईवर चित्रित झालेले हे गाणे काही वर्षांपूर्वी अल्बमच्या स्वरुपात समोर आले होते.

LEAVE A REPLY

*