VIDEO: ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

0

रविवारी विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर लाँच आला.

शेखर जोशी (सुबोध भावे), त्याची पत्नी समायरा जोशी (मुक्ता बर्वे) नित्या आणि नायशा या त्यांच्या दोन मुली यांच्या भोवती ही कथा फिरते.

हृदयांतरचा ट्रेलर नक्कीच या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारा आहे. हृतिक रोशन पहिल्यांदा मराठी सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम करत आहे. पण तरीही तो या सिनेमात मराठी बोलताना दिसणार नाही.

विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’चा सिनेमा याआधी ९ जूनला प्रदर्शित होणार होता. पण, आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ७ जुलै करण्यात आली आहे.


 

LEAVE A REPLY

*