VIDEO : बॉडी बिल्डर सिफिसो थाबेटचा दुर्दैवी मृत्यू

0

दक्षिण आफ्रिकेच्या बॉडी बिल्डर सिफिसो थाबेटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माजी आएफबीबी जुनियर चॅम्पियन सिफिसो लंगेलो थाबेटने बॅकफ्लिप मारताना जीव गमावला.

तो अवघ्या 23 वर्षांचा होता.

75 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत मॅटच्या मध्यभागी येऊन सिफिसो थाबेटने बॅकफ्लिप मारण्याचा प्रयत्न केला.

परंतु ग्रिप सुटल्याने तो जमिनीवर कोसळला. या घटनेत मानेचं हाड मोडल्याने तो जमिनीवर निपचित पडून राहिला. यानंतर त्याने प्राण सोडले.

दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्यात शनिवारी (5 ऑगस्ट) ही स्पर्धा पार पडली. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

*