Video : पहिलावहिला राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला जाण्याआधी अक्षयने केला हा व्हिडीओ शेअर ; नक्की बघा

0
सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने आज गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जातांना त्याआधी अक्षयने एक व्हिडीओ शेयर केला आहे या व्हिडीओमध्ये त्याने तरुण युवकांच्या आत्महत्येवर नाराजी व्यक्त केली आहे.

त्यानंतर त्याने त्यांच्या फेसबुक पेजला नुकताच व्हिडीओ शेयर केला आहे. त्याच्या या यशाची तुलना त्याने बालपणातील निकालासोबत केली आहे. जेव्हा अक्षय एका इयत्तेत असतांना नापास झाला होता.

त्यानंतर त्याच्या वडिलांनी अक्षय तुला भविष्यात काय करायचे आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्याने खेळाडू बनण्याचे त्यांना सांगितले. पण अक्षयवर कधीच दबाव न आणता त्याला जे करायचे आहे ते करू दिले. पण सोबत अभ्यासदेखील करत रहा असेही सांगितले.

त्यानंतर अभिनेता झाला. अक्षयने तरुणाईला मोठा संदेश दिला आहे. कुठल्याही कारणास्तव आत्महत्या करू नका. आपण जग सोडून गेल्यानंतर आपल्या आई वडिलांचा विचार करा.

पुढे मोबाईलमध्ये नुसते राहू नका. आपल्या मुलांसाठी वेळ द्या. त्यांच्यासोबत जेवण करा गप्पा करा असेही मुलांच्या पालकांनी सांगितले.

संघर्ष हेच तर जीवन आहे. प्रत्येक अडचणीला उपाय असतो फक्त तो शोधता आला पाहिजे असेही अक्षय कुमार यावेळी म्हणाला.

यावेळी अक्षय म्हणाला की, या राष्ट्रीय पुरस्काराबाबत मी माझ्या आईला सांगतांना मला माझा लहानपणीचा दिवस आठवला. ज्या दिवशी माझा एका परीक्षेचा निकाल लागला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही मी त्या इयत्तेत नापास झालो होतो. त्यानंतर मी माझ्या वडिलांना मला कशात रुची आहे हे सांगितले आणि वडिलांनी त्यासाठी मला परवानगी दिली पण अभ्यास करायचा अशी अटदेखील घातली होती.

 

 

LEAVE A REPLY

*