VIDEO : ‘जीएसटी’चे नवे ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन

0

जीएसटी म्हणजेच वस्तू सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.

येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे.

केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभाग बिग बी यांची नियुक्ती ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करणार आहे.

यासाठी खास तयार केलेला ४० सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्वीट केला आहे.

‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

या व्हिडिओमध्ये अमिताभ हे जीएसटीचं महत्त्व सांगताना भारताच्या तिरंग्याचा दाखला देताना दिसतात.

जीएसटीसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून या महानायकाची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची निवड करण्यात आली होती.

येत्या १ जुलैपासून जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करप्रणालींऐवजी जीएसटी हा एकच कर लागू होईल.

LEAVE A REPLY

*