VIDEO: कोल्हापूरमधील ‘मराठी तारका’ कार्यक्रमात पोलिसांचा डान्स

0

पोलीस कल्याण निधी कार्यक्रमासाठी कोल्हापुरात जिल्हा पोलीस दलाच्यावतीने मराठी तारका हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात मराठीतील आघाडीच्या तारका अमृता खानविलकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, तेजा देवकर यांच्यासह अनेक दिग्गज तारकांनी कोल्हापूरकारांना बहारदार लावण्या रॉक डान्स, बेले डान्स करून थक्क केलं

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ,पोलीस महासंचालक सतिश माथूर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह उपस्थित हजारो कोल्हापूरकरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद दिली.

एवढंच नव्हे तर कोल्हापूर पोलीस दलातील महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्दीवर मराठी तारकांसोबत डान्स केला.

LEAVE A REPLY

*