Video : ‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांचे आंदोलन

0

नाशिक : अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांत  ईव्हीएम मशिन्समध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आज नाशिकमध्ये सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांकडून आंदोलन करण्यात आले.

सीबीएस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व उमेदवारांनी निदर्शने केली. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या घोळाविरोधात आंदोलने झाली आहेत. त्यामुळे ईव्हीएमप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, याआधी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. नाशिकमध्ये ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढली होती. राज्यातल्या अनेक भागात ईव्हीएम मशिन्ससंदर्भात तक्रारी केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

*