VIDEO : अत्यंत भावनिक आणि संवेदनशील आहे ‘भूमी’चा ट्रेलर

0

संजय दत्तचं पुनरागमन असलेला ‘भूमी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ओमांग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरी ‘भूमी’च्या टायटल रोलमध्ये आहे, तर संजय दत्त अरुण ही भूमिका साकारत आहे.

दिग्दर्शक शेखर कपूरही या सिनेमात दिसणार आहेत. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे.

‘भूमी’ सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि संदीप सिंह यांनी केली आहे. मेरी कोम, सरबजित यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.

22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*