Video : अंगावर रेल्वे जाऊन ही ‘ती’ जिवंत

0

मुंबई : ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, असाच एक प्रकार ७ जून रोजी मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकावर घडला.

भांडुप मध्ये राहणारी प्रतीक्षा नातेकर धावत्या रेल्वे खाली येऊन देखील चमत्कारिकरित्या जिवंत आहे. स्थानकाच्या सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार  टिपला गेला. या दुर्घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रतीक्षाला दुर्घटनेबाबत विचारले असता, मी ऑफिसला जात होती. एका प्लैटफॉर्मवरून दुसऱ्या प्लैटफॉर्मवर जात असताना हा प्रकार घडला.

कानात हेडफोन घातल्याने समोरून येणाऱ्या मालगाडीचा आवाज आला नाही. त्यामुळे दुर्घटना घडल्याचे प्रतीक्षा म्हणाली.

एवढी मोठी दुर्घटना घडून देखील तिच्या शरीरावर किरकोळ जखमा आहेत.

LEAVE A REPLY

*