5 ऑगस्टला उपराष्ट्रपती निवडणूक

0
निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, ‘गरज पडल्यास उपराष्ट्रपती पदासाठी 5 ऑगस्टला मतदान घेतले जाईल.
त्याच दिवशी मतमोजणी होईल. यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे 790 सदस्य मतदान करतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए तीन नावांवर विचार करत आहे.
त्यात एक आहे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, दुसरे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि तिसरे नाव आहे बिहारचे खासदार हुकुमदेव नारायण सिंह यांचे.
उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांच्या कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. ते सलग दोनवेळा या पदासाठी निवडून आले होते.

LEAVE A REPLY

*