रयत व्यवस्थापन परिषदेच्या व्हाईस चेअरमनपदी अ‍ॅड. भगीरथ शिंदे

0

सिन्नर | दि. २५ प्रतिनिधी : देशातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असा नावलौकीक कमावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या (Managing Council ) व्हाईस चेअरमनपदी तालुक्याचे भुमीपूत्र व जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.. भगीशिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

चेअरमनपदी संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू डॉ. अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अ‍ॅड. शिंदे यांच्या रुपाने रयतचे नेतृत्व करण्याची संधी नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळत आहे.

संस्थेच्या मॅनेजींग कौन्सीलची अर्थात संचालक मंडळाची नुकतीच निवड झाली असून या नुतन संचालक मंडळाची पहिली बैठक आज (दि.२५) पूणे येथे संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यात दोघांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील, गणपतराव देशमुख, रामशेठ ठाकूर, अजितदादा पवार, दादाभाऊ कळमकर, बबनराव पाचपुते यांच्यासह संचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*