कर्जमाफीला फॅशन म्हणणार्‍या व्यंकय्या नायडुंवर शिवसेना, काँग्रेसची टीका

0
मुंबई | कर्जमाफी आता फॅशन झाली आहे, असे विधान केल्या बद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यावर शिवसेनेने तसेच काँग्रेसने जोरदार शाब्दीक हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेउन एक सकारात्मक पाउल उचलले असताना व्यकंय्या नायडु यांच्यासारख्या जेष्ठ भाजपाच्या नेत्याने त्यांचा अपमान केला असल्याची प्रतिक्रीया शिवसेना नेते आमि राज्याचे परीवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापुर्वी नायडु कुठला फॅशन शो बघायला गेले होते का असा टोला ही रावते यांनी लगावला, तुम्ही शेतकर्‍यांना योग्य हमीभाव देत नसल्याने शेतकर्यांना आंदोलन करण्याची वेळ आहे आहे. या आंदोलनांना तुम्हीच जबाबदार आहात असा आरोपही रावते यांनी केला.

‘परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. कर्जमाफी म्हणजे आजकाल फॅशन झाली आहे,’ असे व्यंकय्या नायडू यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले. त्यावर संतप्त झालेल्या रावते यांनी व्यंकय्या नायडु यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील नायडु यांचे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.

उत्तर प्रदेशात जेव्हा भाजपाने कर्जमाफी जाहीर केली तेव्हा व्यकंय्या नायडु यांना हा फॅशन शो का दिसला नाही असा सवाल ही पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला। महाराष्ट्रात राज्यात शेतकरी 1 जूनपासून संपावर गेल्याने कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला.

यानंतर राज्य सरकारने अल्प भूधारक शेतकर्‍यांचे 1 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेशमध्येदेखील शेतकर्‍यांनी कर्जमाफीची मागणी केली होती. यातील कर्नाटक, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील राज्य सरकारांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

*