नाशिकच्या राख्यांची परदेशी पाहुण्यांना भूरळ

0

नाशिक । दि. 2 प्रतिनिधी
भाऊ बहिणीचे नाते घट्ट करत त्यांना प्रेमाच्या धाग्यात आयुष्यभर बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण चार दिवसांवर येवून ठेपला आहे. यानिमित्ताने राख्यांची बाजारपेठ सजली असून विविध प्रकारच्या राख्या महिला वर्गाचे लक्ष वेधून घेत आहे. शहरातील मेन रोड, शालिमार चौक, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेसह रस्त्यांच्या दुतर्फा राख्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहे. खरेदीसाठी महिलांसह लहान मुले गर्दी करतांना दिसत आहे. रंगीबेरंगी आणि तितक्याच नाजूक नजाकतीच्या राख्या खरेदीमध्ये मुली आणि महिलांचा उत्साह दिसत आहे.

आज काही परदेशी पाहुण्यांनीही शहरातील राखीच्या दुकानात जाऊन राखीची परंपरा समजावून घेतली.

यंदा लहान मुलांसाठी राखीमध्ये विविध प्रकार आले असून लाईट लागणारी राखी तसेच छोटा भीम आणि इतर प्रसिद्ध कार्टून यावेळी बाजारात दिसत आहेत. बाहुबलीच्या राख्यादेखील बालवर्गाचे आकर्षण ठरत आहेत. या राख्यांचे दर अगदी 10 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यत आहेत. तसेच नेहमी प्रचलित असलेल्या गोंड्यांचे दर मात्र 15 पासून डझनपासून ते 40 रुपये डझनपर्यंत आहेत.

काही साध्या पण चंदनापासून बनवलेल्या राख्या मात्र थोड्या महाग आहेत. एक राखी 20 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत आहे. या राख्या दिसायला आर्कषक आहे. डायमंडच्या राख्या तसेच महिलांसाठी लुम्बा म्हणजेच भाभी राखी देखील यावेळी आकर्षक आहेत. यांचे दर 40 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत आहेत.

बाजारपेठामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहेत. गोल्डन झालर असलेल्या राख्या, मणी, मोती, रंगीबेरंगी खड्यांची डिझाईन असलेली राखी, स्वस्तिक, गणपती, ओम, रुद्राक्ष लावलेल्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. अलीकडे गोंड्याची राखी फारशी चालत नाही.

मात्र काही दुकानांमध्ये चमकीचा कागद लावलेल्या मध्यम आकाराच्या तसेच छोटे रंगीबेरंगी धाग्यातील राख्या उपलब्ध आहेत. देवाला बांधायची राखी म्हणजे देवगोंडा राखीही बाजारात उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी चंदेरीसोनेरी चमकीचे कागद, प्लास्टिकची फुले, रंगीत स्पंज गुंफलेल्या मोठ्या राख्या मात्र बाजारात दिसेनाशा होत आहेत. 5 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत राख्या बाजारात उपलब्ध आहेत. गोल्डन झालर असलेल्या व रंगीबेरंगी खड्यांची डिझाईन असलेल्या राखीची किंमत यंदा 50 ते 100 रुपयांपर्यंत आहे. चांदीचे कोटिंग असलेल्या राखीलासुद्धा यंदा बाजारात मागणी असल्याचे दिसून येत आहे.

राखीचे स्वरूप आधुनिक काळात झपाट्याने बदलत आहे. सध्या असंख्य प्रकारच्या मॉडर्न राख्या बाजारात पाहयला मिळत आहे. गंमत म्हणून राखीत नावीन्य आणि आधुनिकता आली असली तरी रेशमी बंधनाचे प्रतीक असणारी राखी रेशमी धाग्यांनीच बनवलेली असावी असे काही महिलाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*