उपनगरचा खून फसलेल्या टार्गेटचा बळी

0

नाशिक : जेलरोड परिसरातील मंगलमूर्ती नगरमध्ये एका सोळा वर्षीय मुलाचा गैरसमज झाल्याने खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

२० ते २५ युवकांनी पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

तुषार भास्कर साबळे (१६), रा. पंचशील नगर, कसारा, असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो मूळचा कल्याण येथील रहिवासी होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी पेठफाटा पंचवटीत विजय निकम नामक युवकाचा मार्केट यार्ड परिसरात खून झाला होता. त्याचा खून झाला तेव्हा त्या टोळक्यात तुषार साबळे सारखा दिसणारा मुलगा होता. आम्हाला हा तोच आहे अशी माहिती मिळाली होती त्यामुळे आम्ही कार मोटारसायकल्स घेऊन त्यावर हल्ला करून ठार केले असे आरोपींनी आज कबूल केले.

तुषारला मारण्यासाठी आलेल्या टोळक्याने सहा राउंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक राउंड तुषारला लागल्याने तो जखमी झाला त्यानंतर त्याला मैदानात घेऊन जाऊन टोळक्याने भोसकल्याचे समोर आले आहे.

नाशिकरोडला अल्पवयीन मुलाची हत्या

LEAVE A REPLY

*