बागलाण तालुक्यातील दोघे केद्राई बंधाऱ्यात बुडाले; एकाचा मृत्यू

0
चांदवड प्रतिनिधी  | जिल्हाभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले केद्राई, खडकओझर (ता. चांदवड) येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या मुलाचा केद्राई धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज (दि.१९) रोजी घडली.
भाक्षी (ता. सटाणा) येथील रौंदळ कुटूंबिय नातेवाईकांसह केंद्राई मातेच्या मंदिरात जावळाचा कार्यक्रम करण्यासाठी आले होते. आज शुक्रवार असल्याने इथे भाविकांची प्रचंड गर्दी होती.
पालकांना चुकवत श्‍लोक मंगेश रौंदळ (वय १५) हा इतर काही मित्रांसमवेत जवळच असलेल्या धरणाकडे गेला. त्यात दोन जणांनी पाण्यात उडी घेतली व पोहण्यास सुरूवात केली असता गाळात पाय रूतल्याने  दोघेही बुडायला लागलेत.
हा सर्व प्रकार काठावर बसलेल्या सर्व मच्छिमारांनी बघितला व त्यांनी लागलीच समयसूचकता दाखवत पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
यात एकास वाचविण्यात यश आले तर दुसरा श्‍लोक रौंदळ यास स्थानिक नागरिकांनी तात्काळ वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषीत केले. मृत श्‍लोक याच्या पश्‍चात बहीण, आई-वडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*