मनमाडला दोन कोटींच्या नवीन नोटांसह दोघे ताब्यात

0

मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड पोलिसांनी तब्बल 1 कोटी 98 लाख रुपयांच्या नवीन नोटा हस्तगत करून 2 जणांना ताब्यात घेतले.

रात्री पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे,ए. एच.शेख यांनी मनमाड-मालेगांव चौफुलीवर नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते.

त्यांनी एम.एच.12,डी वाय-5736 ही  इनोव्हा गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यात सुमारे  1 कोटी 98 लाख रुपयांच्या नवीन नोटा आढळून आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेऊन या नोटा कुठून आणल्या व कुठे घेऊन जात होते याचा तपास पोलीस करीत आहे.

 

LEAVE A REPLY

*