TWEETS: सचिन तेंडुलकर पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीत

0

सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’बद्दल पंतप्रधानांना सांगितलं आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट मास्टरब्लास्टरने केलं आहे.

 

LEAVE A REPLY

*