TWEET : बिल गेट्स यांचा दिल्लीत रिक्षाने प्रवास

0

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते.

आपल्या भारत दौऱ्याचा एक फोटो देखील त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. रिक्षात बसून इंडिया गेट परिसरात भ्रमंती करत असतानाचा तो फोटो होता.

‘वर्षांतून किमान एकदा तरी मी भारताला भेट देण्याचा प्रयत्न करतो. या प्रत्येक भेटीत मला नेहमीच काहीतरी प्रेरणादायी मिळते’ असे लिहित त्यांनी हा फोटो शेअर केला.

‘इंडिया इज विनिंग इट्स वॉर ऑन ह्यूमन वेस्ट’ नावाचा ब्लॉगही त्यांनी लिहिला. या ब्लॉगच्या माध्यमातून बिल यांनी भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे देखील कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*