TWEET: जॉनचा पहिला मराठी चित्रपट : ‘सविता दामोदर परांजपे’

0
बॉलिवूडमध्ये २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत अभिनेता जॉन अब्राहमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले.

वेगळ्या कथानकांना प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडणारा जॉन आता मराठी चित्रपटसृष्टीकडेही वळला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची तो निर्मिती करत आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली असून त्याची माहिती स्वतः जॉननेच ट्विटरवरून दिली. सेटवरील एक फोटो शेअर करत, ‘जेए एण्टरटेन्मेन्ट्स मराठी फिल्मच्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या सेटवरील पहिला दिवस… मी या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडलोय.अखेर मला चित्रपट निर्मिती करण्याची संधी मिळाली,’ असे त्याने ट्विटरवर लिहिले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘फुगे’ चित्रपटाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे करत आहे. अभिनेता सुबोध भावे आणि राकेश बापट यात मुख्य भूमिका साकारताना दिसतील.

LEAVE A REPLY

*