TWEET : ‘काला करिकालन’चं पोस्टर प्रदर्शित

0

अभिनेता रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

रंजित (Pa. Ranjith) दिग्दर्शित ‘काला करिकालन’ या तमिळ चित्रपटात ते झळकणार आहेत.

रजनीकांत यांच्या जावयाने म्हणजेच अभिनेता धनुषने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

सध्या ट्विटरवरही या चित्रपटाचा हॅशटॅग #Kaala ट्रेंडमध्ये आला आहे.

२८ मे पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

तूर्तास चाहत्यांमध्ये आतापासूनच या चित्रपटाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘काला करिकालन’चं पोस्टर पाहता यातूनही रजनीकांत यांचं वेगळं रुप पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या पोस्टरमध्ये काळ्या आणि लाल रंगाची सांगड घालण्यात आली असून, त्यावर रजनीकांत rajinikanth यांचा चेहराही दिसतो आहे.

LEAVE A REPLY

*