TWEET: काजोलच्या हस्ते मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

0

प्रियांका चोप्रानंतर अजय देवगणही त्याच्या आगामी मराठी चित्रपटासाठी सज्ज झालाय.

त्याच्या आगामी चित्रपटामध्ये मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची समजते.

चित्रपटाच्या नावाबद्दल, कथानकाबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, अजयने पत्नी काजोलच्या हस्ते आपल्या मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

काजोलच्याहस्ते मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे सांगत त्याने ट्विटरवरुन चित्रपटाचा शुभारंभ झाल्याचा एक फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

या फोटोमध्ये नाना पाटेकर देखील दिसत आहेत.

 

LEAVE A REPLY

*