ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

0
दिंडोरी | वणी-नाशिक रस्त्यावरील लखमापूर फाट्यानजिक दोन दुचाकींची धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरुन ट्रक गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

लखमापूर फाट्याजवळ रात्री आठच्या सुमारास वणी-नाशिक मार्गावर लखमापूर फाट्यावर चंद्रकला लॉन्सनजीक दुचाकीस्वार योगेश विश्‍वनाथ चतुर रा.वणी हा दिंडोरीकडून वणीकडे येत असतांना समोरुन कुठलेही वाहन नसताना ट्रक क्र.जी.जे.१, डीव्ही ५८३८ याला ओव्हरटेक करत होता.

याचवेळी बाजूच्या चंद्रकला लॉन्सकडून धनंजय भगवान सोेनवणे (रा.लखमापूर) यांच्या दुचाकीची धडक बसल्याने यागेेश चतुर ओव्हरटेक करीत असलेल्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला तर धनंजय सोनवणे व योगेश चतुरच्या पाठीमागे बसलेली महिला ही गंभीर जखमी झाली.

जखमींवर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*