त्र्यंबकेश्वर बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

0

त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले त्र्यंबकेश्वर येथील बस स्थानक अनेक समस्यांनी ग्रासले आहे. रा. प. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

तेथील मनमानी कारभारामुळे वाहन चालकास बसस्थानकात प्रवेश करतांना आणि बाहेर पडतांना अशा दोन्ही मार्गाच्या रस्त्याच्या बाजूला  खाजगी प्रवाशी वाहने (टॅक्सी), रिक्षा पार्क केल्या जातात.

तसेच बाहेर गावाहून येणारी खाजगी वाहने स्थानकाच्या आवारात लावली जातात.

त्यामुळे हा परिसर फक्त रा. प. च्या वाहनांनसाठी मोकळा असायला हवा तो खाजगी वाहने आणि खाजगी प्रवाशी वाहने (चारचाकी, दुचाकी ), यांनी गजबजलेल्या असतो.

समस्या

स्थानकावर सर्व बाजूने साफसफाई देखील होत नसल्याने तेथे विविध ठिकाणी कचरा साचलेल्या असतो. याला कारण असे, नियोजित सफाई कामगाराने त्याची आठ्वडा सुट्टी व इतर कारणांसाठी सुट्टी घेतली तर बदली कामगार दिला जात नाही.

महत्वाचे म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्र्यंबकेश्वर येथे पूजा होत असते. यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते असते.

गरज 

तसेच काही मार्गावर रा. प. वाहने नादुरस्त होतात तर काही वाहने कामगिरी बंद असल्या कारणाने येऊ शकत नाही तर त्याऐवजी उपलब्ध रा. प. वाहनातूनच फेरीसाठी वाहने पाठविण्यासाठी स्थानक प्रमुखाची आवश्यकता असते कारण काही रा. प. कर्मचारी वाहतूक नियंत्रकांना नकार देऊ शकतात.
शालेय विद्यार्थी / विद्यार्थिनींची रा. प. वाहनांची फेरी विषयी समस्या
काही दुर्दैवी घटना घडल्यास पोलीस स्टेशनची कामे करण्यास
बसस्थानकावरील खाजगी / मालकीची वाहने स्थानकात लावण्यास (पार्किंग) करण्यास मनाई करणे

LEAVE A REPLY

*