गट विकास अधिकार्‍यांच्या बदल्या

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विकास सेवा गट ब संवर्गातील सुमारे 20 अधिकार्‍यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात श्रीरामपूर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी ए.ए. शेख यांची येवल्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नगरचे सहायक प्रकल्प अधिकारी एस. डी. काळोखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वर्धा येथील सहायक गट विकास अधिकारी या जामखेड पंचायत समितीत रूजू होणार आहेत. अकोले पंचायत समितीतील सहयक गट विकास अधिकारी व्ही. यू. अहिरे यांची नियुक्ती जळगाव जिल्ह्यातील पारोळा पंचायत समितीत करण्यात आली आहे. दौंडचे व्ही. जी. गुळवे यांची सातारा जिल्हा परिषदेत नियुक्ती झाली आहे.

LEAVE A REPLY

*