मोहाडीत गोपालकृष्ण व मोहाडमल्ल यात्रोत्सवास प्रारंभ

0

मोहाडी । दि. 14 वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील आराध्य दैवत अष्टबाहु गोपालकृष्ण, ग्रामदैवत मोहाडमल्ल महाराज व जागृत देवस्थान कानिफनाथ महाराज यांच्या संयुक्त यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

यात्रोत्सवानिमित्त कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फांऊडेशन आयोजित प्रबोधन व्याख्यान मालेचे उद्घाटन जि.प.अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण प्रादेशिक उपआयुक्त राजेंद्र कलाल होते. माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी यांचे ‘सामान्य माणूस आणि राजकीय सद्यास्थिती, या विषयावर व्याख्यान झाले.

सात दिवस चाललेल्या व्याख्यानात विनायक गोविलकर यांचे ‘ पैशाचा प्रवास’ , सामान्य प्रशासन उपआयुक्त सुकदेव बनकर यांचे ‘ग्रामगिता’, ज्येष्ठ प्रत्रकार श्रीमंत माने यांचे ‘तरुणांची स्वप्ने आणि समाज’ विजय पत्राळे यांचे ‘सर्वांसाठी भगद्गिता’, कौशल इनामदार यांचे ‘ मराठी संगिताची वाटचाल’, ललित बहाले यांचे ‘ स्वामी नाथन आयोग’ या विषयावर व्याख्यान झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर गावीत, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी, उपविभागीय अधिकारी उद्य किसवे, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेंडसे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलिस अधिक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

दि.15 रोजी गोपाळकाला असे कार्यक्रम होईल. यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धा, दहीहंडी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

यात्रोत्सवासाठी रहाट पाळणे, चक्री, मौत का कुँवा ,जादुचे प्रयोग आदींसह मनोरंजनाचे खेळ होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यात्रोत्सव समितीचे गणपत जाधव, गोपालकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष उत्तमराव जाधव, मोहाडमल्ल देवस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ ढेपले, कादवास संचालक शहाजी सोमवंशी, माजी जि.प.गटनेते प्रवीण जाधव, जि.प.सदस्या सारीका नेहरे, डॉ.विलास देशमुख, सुरेश कळमकर, मुकूंद पाटील, वनिता देशमुख, बाळासाहेब उदार, विलास पाटील, सरपंच सुरेश गावीत, उपसरपंच रवींद्र जाधव, बापूसाहेब पाटील, रामदास मौले आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*